Jammu & Kashmir: डोडा येथे लष्कराने फडकवला 100 फूट उंच तिरंगा; चिनाब खोऱ्यात दुसरा सर्वात मोठा ध्वज

एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने या प्रयत्नाला देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना योग्य श्रद्धांजली असल्याचे म्हटले.

Jammu & Kashmir: डोडा येथे लष्कराने फडकवला 100 फूट उंच तिरंगा; चिनाब खोऱ्यात दुसरा सर्वात मोठा ध्वज
National Flag

जम्मू-काश्मीरमधील डोडा या डोंगराळ जिल्ह्यात गुरुवारी भारतीय लष्कराने 100 फूट उंच राष्ट्रध्वज फडकवला. चिनाब खोऱ्यात लष्कराने फडकवलेला हा दुसरा उंच ध्वज आहे. काही दशकांपूर्वी हे ठिकाण दहशतवादाचा बालेकिल्ला असल्याचे अहवालात म्हटले आहे. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने या प्रयत्नाला देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना योग्य श्रद्धांजली असल्याचे म्हटले. गेल्या वर्षी जुलैमध्ये किश्तवाड शहरात याच उंचीवर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 09, 2023 06:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).