पाकिस्तानच्या वतीने भारतावर आरोप करताना सांगण्यात आले की, त्यांच्या देशाच्या सीमेवर भारताकडून एक सुपरसॉनिक क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या सीमेच्या सुमारे 124 किमी आत पडले. ज्याचा शोध पाकिस्तानी हवाई संरक्षण यंत्रणेने घेतला. आता या प्रकरणावर भारताकडून उत्तर देण्यात आले आहे. ज्यामध्ये भारताने हे क्षेपणास्त्र डागल्याचे मान्य केले आहे.

भारताच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानात पडलेल्या क्षेपणास्त्रावर अधिकृत उत्तर देताना सांगितले की, देखरेखीदरम्यान बिघाड झाल्याने हे क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये पडले. ही घटना अपघाताने घडली असून, या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. म्हणजेच चुकून हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या सीमेवर डागल्याचे भारताने पाकिस्तानला सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)