कॅनडासोबतच्या राजनैतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने जवळपास महिनाभरानंतर पुन्हा एकदा कॅनडामधील अनेक श्रेणींसाठी व्हिसा सेवा सुरू केली आहे. एंट्री व्हिसा, बिझनेस व्हिसा, मेडिकल व्हिसा आणि कॉन्फरन्स व्हिसा अशा 4 श्रेणींमध्ये भारताने व्हिसा सेवा सुरु केली आहे. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी ही माहिती दिली. अशाप्रकारे 26 ऑक्टोबरपासून भारत कॅनडात व्हिसा सेवा अंशतः पुन्हा सुरू करेल, जी राजनैतिक वादामुळे गेल्या महिन्यात बंद करण्यात आली होती. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालय आणि टोरंटो व व्हँकुव्हरमधील त्यांचे वाणिज्य दूतावास यांना सुरक्षेच्या कारणास्तव व्हिसा सेवा तात्पुरती स्थगित करण्यास भाग पाडले गेले होते. या संदर्भात सुरक्षा परिस्थितीचा विचारपूर्वक आढावा घेतल्यानंतर, अंशतः चार श्रेणींमध्ये व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. (हेही वाचा: Sri Lanka Visa Update: भारतासह 6 देशांना श्रीलंका व्हिसा मोफत)
The latest Press Release on resumption of visa service may be seen here. @MEAIndia @IndianDiplomacy @PIB_India @DDNewslive @ANI @WIONews @TOIIndiaNews @htTweets @cgivancouver @IndiainToronto pic.twitter.com/iwKIgF2qin
— India in Canada (@HCI_Ottawa) October 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)