हैद्राबाद येथून अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर येत आहे. या ठिकाणी एका क्षुल्लक कारणावरून कुत्रा, मालक आणि त्याच्या पत्नीवर लाठीने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून व सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अहवालानुसार, काही दिवसांपूर्वी मदुरानगर येथील मधु नावाच्या व्यक्तीचा कुत्रा शेजारील धनंजयच्या घरात घुसला होता. यावेळी धनंजयच्या कुटुंबीयांनी या कुत्र्याने आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला. त्यावेळी मधुने ही बाब कशीतरी मिटवली. मात्र जेव्हा मधुचा भाऊ श्रीनाथ आपल्या पत्नीसह पाळीव कुत्र्याला घेऊन फिरायला बाहेर पडला. तेव्हा धनंजयने त्याच्यावर हल्ला केला. धनंजयने त्याच्या दोन मित्रांसह श्रीनाथ, श्रीनाथची पत्नी आणि त्यांच्या पाळीव कुत्र्यावर लाठीमार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कुटुंबाला आणि कुत्र्याला स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या मदुरानगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा: Pet Dog Brutally Beaten in Elevator: सोसायटीच्या लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्यास बेदम मारहाण, गुरुग्राम येथील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)