केरळ हायकोर्टाने शुक्रवारी बलात्काराच्या आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. कथित बलात्काराच्या घटनेनंतर महिलेने आरोपी पुरुषाकडून 5,000 रुपये  घेतल्याचे आढळून आले होते. यासाठी न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सची मदत घेतली, ज्यात असे दिसून आले की लैंगिक संबंध संमतीने प्रस्थापित झाले होते आणि त्या बदल्याने महिलेला 5,000 रुपये प्राप्त झाले होते.

फिर्यादीनुसार, महिलेने आरोप केला होता की, आरोपी व्यक्तीने अन्य एका व्यक्तीसोबत पीडितेला तिरुवल्ला येथील हॉटेलमध्ये आणले. तिथे तिला दारू पाजून बेशुद्ध केले आणि तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेऊन त्याचे अश्लील व्हिडिओ बनवले. पुढे हे व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रसारित केले गेले. मात्र आरोपी व्यक्तीच्या वकिलाने सांगितले की, महिलेच्या दाव्याची सत्यता सांगणारा किंवा  कथित गुन्ह्याशी संबंध जोडण्यासाठी कोणताच पुरावा रेकॉर्डवर नाही. त्यामुळे कथित आरोपी जामिनास पात्र आहे. या पकारणी उच्च न्यायालयाने, प्रथम माहिती विधान (FIR) आणि व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉट्सचा अभ्यास केल्यानंतर, ती महिला स्वेच्छेने हॉटेलमध्ये गेली होती, हे लक्षात आले. तसेच सेक्सच्या बदल्यात तिला पैसेही मिळाल्याचे दिसून आले. त्यांनतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. (हेही वाचा: Chhattisgarh Crime: छत्तीसगडमध्ये 2 बहिणींवर सामूहिक बलात्कार, भाजप नेत्याच्या मुलासह 10 जणांना अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)