Chhattisgarh Crime: छत्तीसगडमध्ये 2 बहिणींवर सामूहिक बलात्कार, भाजप नेत्याच्या मुलासह 10 जणांना अटक
Stop Rape (Representative image)

छत्तीसगडमधील रायपूरमध्ये पीडितेच्या एका मंगेतरसोबत रक्षाबंधन साजरी करून परतत असताना दोन बहिणींवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दहा हल्लेखोरांच्या एका गटाने बळजबरीने त्यांचा रस्ता अडवून ही घटना केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन आरोपीने या दोन बहिणींना आधी अडवले. या तिघांनी त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल लुटल्याचा आरोप आहे. इतर सात आरोपी चार मोटारसायकलवरून घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, आरोपींनी दोघी बहिणींना मुख्य रस्त्यापासून दूर एका निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर बलात्कार केला. (हेही वाचा - Bihar News: श्रमजीवी एक्सप्रेस ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; चौकशी चालू)

दोन मुलींसोबत आलेल्या व्यक्तीवरही गंभीर शारीरिक अत्याचार करण्यात आले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्थानिक भाजप नेत्याच्या मुलासह दहा जणांना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये गुन्हेगारी कारवायांचा इतिहास असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. पूनम ठाकूर हा देखील मुख्य संशयितांपैकी एक आरोपी आहे, नुकतीच ऑगस्ट 2023 मध्ये जामिनावर ज्याची सुटका झाली होती. पूनम ठाकूर हा स्थानिक भाजप नेते लक्ष्मी नारायण सिंह यांचा मुलगा आहे.