Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Bihar News: नवी दिल्ली राजगीर श्रमजीवी एक्स्प्रेसच्या डब्याच्या टॉयलेटमध्ये शुक्रवारी 25 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. राजगीर रेल्वे स्थानकावर गाडी धुण्यासाठी  लाईनवर गेल्याने ही घटना उघडकीस आली. सफाई कर्मचार्‍यांनी कोच क्रमांक EC16414C च्या एका शौचालयात बसलेल्या स्थितीत मृतदेह पाहिला. त्यांनी तत्काळ जीआरपी आणि आरपीएफला माहिती दिली. गाडी सकाळी साडेदहा वाजता राजगीर रेल्वे स्थानकावर आली आणि नंतर साडेअकरा वाजता पिट लाइन विभागात पोहोचली.

पोलीसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतला. जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना हा मृतदेह शौचालयाच्या आत कमोडवर दिसला आणि एका टोकापासून तिच्या गळ्यात दुपट्टा बांधलेला होता, तर दुसरे टोक फासाने बांधलेले होते. "महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तिची हत्या झाल्याचं दिसतंय आणि कुणीतरी ही आत्महत्या असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तपास सुरू आहे," असं जीआरपीनं अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवर मोठी खळबळ उडाली आहे.पोलीसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. लवकरच या घटनेचा आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. मृतदेहाची ओळख अद्यापही पटली नाही म्हणून पोलीसांसमोर आवाहने उभी राहीली आहेत.