HC On Consensual Sexual Acts: दोन प्रौढ लग्न झालेल्या व्यक्तींनी आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त, इतर कोणासोबत सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यास, तो गुन्हा मानता येणार नाही असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. दोन्ही पार्टनर्स प्रौढ असतील आणि सेक्ससाठी त्यांची सहमती असेल, तर त्यांचे लग्न झाले आहे की नाही ही बाब गौण ठरते. न्यायमूर्ती अमित महाजन यांच्या खंडपीठाने बलात्काराच्या आरोपीला जामीन मंजूर करताना ही टिप्पणी केली. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित खोट्या केसेसमुळे आरोपीची प्रतिमा मलिन होते. न्यायालयाने म्हटले आहे की, समाजाचे नियम विवाहाच्या चौकटीतील लैंगिक संबंधांना आदर्श मानतात, परंतु जर दोन प्रौढ व्यक्तींमध्ये संमतीने लैंगिक संबंध झाले तर त्यांना कोणत्याही गुन्ह्यासाठी जबाबदार धरता येणार नाही.

या प्रकरणात महिलेने आरोप केला होता की, आरोपीने लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी अनेकवेळा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर महिलेला समजले की आरोपी आधीच विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. आता कोर्टात हे सिद्ध झाले की, आरोपी विवाहित असल्याचे माहीत असतानाही महिला ते संबंध पुढे चालू ठेवू इच्छित होती. त्यानंतर न्यायालयाने मार्च 2023 पासून कोठडीत असलेल्या या आरोपीला जामीन मंजूर केला. (हेही वाचा: Unnatural Sex, Husband-Wife and HC: पत्नीच्या संमतीशिवाय ठेवलेले अनैसर्गिक शारीरिक संबंध बलात्कार नव्हे; Marital Rape बाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)