Unnatural Sex, Husband-Wife and HC: पत्नीच्या संमतीशिवाय ठेवलेले अनैसर्गिक शारीरिक संबंध बलात्कार नव्हे; Marital Rape बाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

खंडपीठाने सांगितले की, वैध विवाहादरम्यान पत्नी तिच्या पतीसोबत राहत असल्यास आणि ती पंधरा वर्षांपेक्षा कमी वयाची नसेल, तर पतीने स्वत:च्या पत्नीसोबत ठेवलेले कोणतेही लैंगिक संबंध बलात्कार ठरत नाहीत.

Unnatural Sex, Husband-Wife and HC: पत्नीच्या संमतीशिवाय ठेवलेले अनैसर्गिक शारीरिक संबंध बलात्कार नव्हे; Marital Rape बाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Court | (Photo credit: archived, edited, representative image)

Unnatural Sex, Husband-Wife and HC: मध्य प्रदेश हायकोर्टाने पती-पत्नीमधील शारीरिक संबंधाबाबत एक मोठी टिपण्णी केली आहे. भारतात 'वैवाहिक बलात्कार' हा गुन्हा म्हणून ओळखला जात नाही, असे नमूद करून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सांगितले की, पत्नीच्या संमतीशिवाय एखाद्या पुरुषाने पत्नीसोबत ठेवलेले अनैसर्गिक लैंगिक संबंध हा बलात्कार ठरणार नाही. अशा परिस्थितीत या कृत्यासाठी पत्नीची संमती महत्वाची ठरत नाही. न्यायमूर्ती गुरपाल सिंग अहलुवालिया यांच्या खंडपीठाने सांगितले की, वैध विवाहादरम्यान पत्नी तिच्या पतीसोबत राहत असल्यास आणि ती पंधरा वर्षांपेक्षा कमी वयाची नसेल, तर पतीने स्वत:च्या पत्नीसोबत ठेवलेले कोणतेही लैंगिक संबंध बलात्कार ठरत नाहीत.

हायकोर्टाने म्हटले आहे की, कायद्याच्या या स्थितीला केवळ आयपीसीचे कलम 376B अपवाद आहे. यामध्ये विभक्त झालेल्या किंवा वेगळे राहत असलेल्यापत्नीसोबत लैंगिक कृत्य केल्यास तो बलात्कार होईल. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मनीष साहू नावाच्या व्यक्तीविरुद्ध त्याच्या पत्नीने दाखल केलेला एफआयआर फेटाळताना ही टिप्पणी केली आहे. एफआयआरमध्ये महिलेने पतीवर आयपीसीच्या कलम 377 अंतर्गत अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा आरोप केला होता. मात्र पतीने दावा केला की, हे दोघे पती-पत्नी असल्याने त्यांच्यामधील कोणतेही अनैसर्गिक लैंगिक संबंध हे आयपीसीच्या कलम 377 नुसार गुन्हा ठरत नाहीत. (हेही वाचा: Karnataka Shocker: 8 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी घरमालकाला अटक)

पहा पोस्ट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 03, 2024 04:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).