
Karnataka Shocker: कर्नाटक पोलिसांनी मंगळवारी बेंगळुरूच्या मदननायकनहल्ली पोलीस स्टेशन परिसरात ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी घराच्या मालकाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी भाड्याच्या घरात एकटी असताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तिचे आई-वडील कामावर गेले होते. पीडितेचे कुटुंब महिनाभरापूर्वीच या घरात राहायला आले होते.