Half-Day Holiday For Banks: केंद्र सरकारने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने 22 जानेवारी 2024 रोजी, दुपारी 2:30 वाजेपर्यंत देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापने अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका/सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या/सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था आणि प्रादेशिक ग्रामीण बँका अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त 22 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद राहणार आहेत. अर्थमंत्रालयाने याबाबत परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे. (हेही वाचा: High-Level Cyber Team In Ayodhya: राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी उच्चस्तरीय सायबर तज्ञ टीम अयोद्धेत तैनात)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)