Gujarat Tragedy: गणपती विसर्जन करताना राजकोट धरणात काका पूतण्याचा बुडून मृत्यू (Watch Video)

महाराष्ट्राप्रमाणेच देशभरात विविध ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून गणपती विसर्जनावेळी अनेकदा घडत असलेल्या दुर्दैवी घटना इतर राज्यांमध्येही पाहाला मिळतात. अशाच एका घटनेत गणपती विसर्जन करतेवळी काका पूतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

Gujarat Tragedy: गणपती विसर्जन करताना राजकोट धरणात काका पूतण्याचा बुडून मृत्यू  (Watch Video)

महाराष्ट्राप्रमाणेच देशभरात विविध ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून गणपती विसर्जनावेळी अनेकदा घडत असलेल्या दुर्दैवी घटना इतर राज्यांमध्येही पाहाला मिळतात. अशाच एका घटनेत गणपती विसर्जन करतेवळी काका पूतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गुजरातमधील राजकोट धरणात गणेशविसर्जनावेळी ही घटना घडली. आमची सहयोगी इंग्रजी वेबसाईट लेटेस्टलीने दिलेल्या वृत्तानुसार, राजकोटमध्ये शहरातील कोठारिया रोडवर असलेल्या मणिनगर सोसायटीतील रहिवाशांसोबत ही घटना घडली. विसर्जन सोहळ्यासाठी आजी धरणाजवळ सोसायटीतील रहिवासी जमले होते. गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी तीन जण नदीत गेले. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात दोन जण वाहून गेल्याने ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाने तातडीने प्रतिसाद देत पीडितांचे मृतदेह ताब्यात घेतले.

ट्विट

ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2023 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).