बोर्डाची परीक्षा (Board Exam) विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची परीक्षा असते. अशा वेळी परीक्षेला वेळवर पोहचण्यासाठी विद्यार्थी प्रयत्नशील असतात. अशा वेळी जर कोणी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचला तर, गुजरातच्या (Gujrat) भुजमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. बोर्डाच्या परिक्षेला आलेल्या विद्यार्थिनीला कळाले की तिच्या वडिलांनी चुकून दुसऱ्या केंद्रावर आणले आहे. त्यावेळी निशा या विद्यार्थनीच्या डोळ्यात पाणी आले पण सुदैवाने तिथे उभ्या असलेले  पोलीस जे.व्ही. ढोला यांच्या नजरेत हा प्रकार आला त्यांनी तातडीने तिला दुसऱ्या परिक्षा केंद्रात स्वत: पोहचवले. परीक्षा सुरु होण्यास  10 मिनीट असताना ते परीक्षा केंद्रावर (Exam Centre) पोहचले.  सद्या सर्वत्र या पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतृक होत आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)