Gujarat Boat Accident: गुजरातमधील वडोदरा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. अहवालानुसार, या ठिकाणी हर्णी मोटनाथ तलावात बोट उलटून तब्बल 16 मुलांचा मृत्यू झाला आहे. बोटीवर एकूण 31 लोक होते, ज्यात न्यू सनराईज स्कूलचे 23 विद्यार्थी, चार शिक्षक आणि बोट ऑपरेटरसह चार जण होते. या अपघातामध्ये बचावलेल्या सर्वांना एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रिपोर्ट्सनुसार, न्यू सनराईज स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक आणि इतर स्टाफ हर्णी तलावाला भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी 16 जणांची क्षमता असलेल्या बोटीमध्ये जवळजवळ 31 लोकांना बसवण्यात आले. त्यानंतर काही वेळातच बोट तलावात उलटली. बोट तलावात पडताच आरडाओरडा झाला व त्यावेळी तलावाजवळ असलेल्या लोकांनी तत्काळ हर्णी तलाव व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यानंतर बचावकार्य सुरु झाले. या घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई आणि अपघातातील जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. (हेही वाचा: Sudden Death in Madhya Pradesh: इंदूरमध्ये कोचिंग क्लासमध्ये शिकत असताना विद्यार्थ्याला आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)