भारतात रेल्वेचे (Indian Railway) खूप मोठे जाळे आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी स्वस्त आणि मस्त रेल्वेचा वापर केला जातो. कोट्यावधी लोक दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांमधील काही लोक विनातिकीट प्रवास (Without Ticket Traveler ) करत असतात. या विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात भारतीय रेल्वेने मोहिम आखली होती. या मोहिमेत दक्षिण रेल्वेमधील मुख्य तिकीट निरिक्षक रोसलिन अरोकिया मॅरी (Rosaline Akrokia Mary) यांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. मॅरी यांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल 1.03 कोटी रुपये वसूल केले आहे. या महिला टीसीच्या कामगिरीमुळे रेल्वे मंत्रालयाने ट्विटकरुन त्यांचे कौतुक केले.
पहा ट्विट -
Showing resolute commitment to her duties, Smt.Rosaline Arokia Mary, CTI (Chief Ticket Inspector) of @GMSRailway, becomes the first woman on the ticket-checking staff of Indian Railways to collect fines of Rs. 1.03 crore from irregular/non-ticketed travellers. pic.twitter.com/VxGJcjL9t5
— Ministry of Railways (@RailMinIndia) March 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)