दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने डुप्लिकेट म्हणजेच खोटी ‘बेटनोवेट-एन' (Betnovate-N) क्रीम  तयार करणाऱ्या बनावट वैद्यकीय कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून क्रीमच्या 2,200 भरलेल्या ट्यूब्ज आणि 68,000 रिकाम्या ट्यूब्ज जप्त केल्या आहेत. एका अधिकाऱ्याने रविवारी याबाबत माहिती दिली. गुन्हे शाखेने दिल्लीतील गुलाबीबाग औद्योगिक परिसरातील या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. यातील मास्टरमाइंडलाही अटक करण्यात आली आहे. अवन मोंगा (45) असे आरोपीचे नाव असून तो दिल्लीतील विष्णू गार्डन येथील रहिवासी आहे. त्वचेच्या विविध समस्यांवर बेटनोवेट-एन ही क्रीम वापरली जाते.

Fake Medicine Products Factory Busted-

A fake medical factory preparing duplicate ‘Betnovate-N’ was busted by the #DelhiPolice's Crime Branch and 2,200 filled tubes and 68,000 empty tubes of the skin ointment seized, an official said on Sunday, adding that they have also arrested the mastermind.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)