पाकिस्तान जम्मू-काश्मीरमधील आपल्या नापाक कारवाई काही केल्या थांबवत नाही आहे. ज्याला भारतीय लष्कर वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देत असते. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील करहामा कुंजर गावात शुक्रवारी रात्री दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. सध्या लष्कराप्रमाणेच बचावकार्य सुरू आहे. चकमकीबाबत बारामुल्लाचे एसएसपी आमोद अशोक नागपुरे म्हणाले, 'काही संशयास्पद हालचाली झाल्याची माहिती मिळाली. घेरावानंतर शोधमोहीम राबवण्यात आली आणि त्यादरम्यान आमच्या बाजूने गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी ठार झाला आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)