ग्रीन एनर्जी कंपनी गोल्डी सोलरने येत्या दोन आर्थिक वर्षांमध्ये सौरऊर्जा उत्पादन आणि विक्रीपश्चात सेवा या क्षेत्रांमध्ये 5,000 लोकांना नोकरी देण्याची योजना आखली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) ईश्वर ढोलकिया यांनी ही माहिती दिली आहे. गुजरातस्थित कंपनी आपली मॉड्यूल उत्पादन क्षमता सहा गिगावॅट्स (GW) पर्यंत वाढवण्यासाठी 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या प्रक्रियेत आहे.

ढोलकिया म्हणाले, ‘गोल्डी सोलरची योजना तळागाळात रोजगार निर्माण करण्याची आहे. कौशल्य विकास कार्यक्रम हा आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत विविध कार्यांसाठी 5,000 हून अधिक लोकांना कामावर घेण्याचे कंपनीचे लक्ष्य साध्य करण्यात मदत करेल.’ ढोलकिया यांनी माहिती दिली की, त्यांच्या कंपनीने पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रमुख लार्सन अँड टुब्रो (L&T) च्या धर्मादाय शाखासोबत करार केला आहे. या भागीदारीअंतर्गत सौरऊर्जा उत्पादन क्षेत्रासाठी कुशल कामगारांची निर्मिती केली जाईल.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)