ED कडून आज मध्य प्रदेश, महाराष्ट्रात PMLA case मध्ये 11 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. ईडी अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, त्यांनी मध्य प्रदेशातील कंपनी आणि तिच्या संचालकांविरुद्ध 11 परिसरांमध्ये झडती घेतली, ज्यांनी 109.87 कोटी रुपयांची UCO बँकेच्या नेतृत्वाखालील संघाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मध्य प्रदेशातील इंदूर, जौरा आणि मंदसौर आणि महाराष्ट्रातील अकोला येथे Narayan Niryat India Private Limited च्या समूह कंपन्या आणि मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 च्या तरतुदींनुसार संचालकांच्या निवासस्थानांची झडती घेण्यात आली.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)