Dog Meat: राजस्थानमधून कुत्र्याचे मांस आणून ते बेंगळुरू येथे विकले जात असल्याचा आरोप आज संध्याकाळी हिंदू कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर यशवंतपूर रेल्वे स्थानकावर मोठा तणाव निर्माण झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी स्टेशनवर येणा-या जयपूर ट्रेनवर हल्लाही केला. तसेच काही मांसाच्या पेट्यांची तपासणी केली असता, त्यामध्ये मटणाऐवजी कुत्र्याचे मांस सापडल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. या वादामुळे रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला. अनेक माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.

राजस्थानमधून एकूण 4,500 किलो मांसाच्या 90 बॉक्सची आवक झाल्याने तणावात आणखीनच भर पडली. वाद वाढूनही पुढे मांसाच्या प्रभारी व्यापाऱ्याने तपासणीसाठी आणखी बॉक्स उघडण्यास परवानगी देण्यास नकार दिला. वाढता गोंधळ पाहून अन्न सुरक्षा, गुणवत्ता विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यांनीही उर्वरित मांसाच्या पेट्यांची पुढील तपासणी करण्यास परवानगी दिली नाही. प्राथमिक अंदाजानुसार मांसाचे वजन 5,000 किलो होते, तथापि, कॉटनपेट पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने हे प्रमाण 1,500 किलो असल्याची पुष्टी केली. अधिकारी सध्या शिपमेंटचा स्रोत आणि प्रेषकाकडे आवश्यक परवानग्या आहेत का याचा तपास करत आहेत. अन्न निरीक्षक देखील साइटवर आहेत. भारतात, कुत्र्याच्या मांसाचा वापर आणि व्यापार कायदेशीर निर्बंधांच्या अधीन आहे. याचे विशिष्ट नियम राज्यानुसार बदलतात. प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960, प्राण्यांना अशा प्रकारे मारण्यास आणि खाण्यास प्रतिबंधित करतो. (हेही वाचा: Ghaziabad Animal Cruelty: घरासमोर फिरत असल्याने वाद, दोन पाळीव कुत्र्यांवर चाकूने हल्ला, शेजारच्यांवर गुन्हा दाखल)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)