Delhi: जंतर-मंतरवर शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी संयुक्त किसान मोर्चासाठी 200 लोक आणि किसान मजदूर संघर्ष समितीच्या 6 जणांना दररोज सकाळी 11 ते 5 या वेळेत आंदोलन स्थळी उपस्थित राहण्याची परवानगी असेल. दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकर्‍यांना बसमधून सिंघू सीमेवरुन नियुक्त केलेल्या ठिकाणी नेले जाईल. कोविडवरील निर्बंध लक्षात घेता मार्च काढू नका, असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. निषेध शांततेत राहिला पाहिजे यासाठी व्यापक बंदोबस्त ठेवला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)