Delhi Court Grants Bail to Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी मोठा दिलासा मिळाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टातून जामीन मिळाला. न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. अरविंद केजरीवाल हे मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना 21 दिवसांचा जामीन मिळाला होता. निवडणूक संपताच ते 2 जूनला पुन्हा तुरुंगात गेले. मात्र आता 18 दिवसांनी त्यांना नियमित जामीन मिळाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली दारू धोरण प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. केजरीवाल यांच्या वकिलाने राऊस एव्हेन्यू कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर 20 जून रोजी सलग दुसऱ्या दिवशी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली.

या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देता यावे म्हणून ईडीने जामीन बाँडवर स्वाक्षरी करण्यासाठी 48 तासांचा अवधी द्यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. त्यावर न्यायमूर्तींनी या आदेशाला स्थगिती दिली जाणार नाही, असे सांगितले. यापूर्वी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने दावा केला होता की, अरविंद केजरीवाल यांनी दारू धोरणासाठी 100 कोटी रुपयांची लाच मागितली होती. (हेही वाचा: Pro-tem Speaker of Lok Sabha: लोकसभेचे सदस्य Bhartruhari Mahtab यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)