मुंबई-दिल्ली एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला विमानात शौच आणि लघवी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. दिल्लीच्या आयजीआय विमानतळ पोलीस ठाण्यात फ्लाइट कॅप्टनने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, 24 जून रोजी एअर इंडियाचे फ्लाइट AIC 866 हे मुंबईहून दिल्लीला प्रवास करताना हवेत असताना सीट क्र. 17F वरील प्रवाशाने विमानात शौच, लघवी केली तसेच तो त्या ठिकाणी थुंकला. एफआयआरमध्ये पुढे म्हटले आहे की, हे गैरवर्तन केबिन क्रूने पाहिले होते. नंतर फ्लाइट कॅप्टनला या गैरवर्तनाची माहिती देण्यात आली.

विमान दिल्ली विमानतळावर उतरताच, एअर इंडियाच्या सुरक्षा प्रमुखाने आरोपी प्रवाशाला ताब्यात घेतले. त्यानंतर याबाबत दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवाशाला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला जामीन मंजूर केला. पुढील तपास सुरू आहे. आरोपी प्रवासी हा आफ्रिकेत काम करणारा स्वयंपाकी आहे. (हेही वाचा: पावसात भारतीय रेल्वेचे वाईट हाल; मुंबई-इंदूर अवंतिका एक्स्प्रेसचा एसी डबा लागला गळू, प्रवाशांचा संताप)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)