Avantika Express Water Leak Videos: पावसात भारतीय रेल्वेचे वाईट हाल; मुंबई-इंदूर अवंतिका एक्स्प्रेसचा एसी डबा लागला गळू, प्रवाशांचा संताप

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे.

Avantika Express Water Leak Videos: पावसात भारतीय रेल्वेचे वाईट हाल; मुंबई-इंदूर अवंतिका एक्स्प्रेसचा एसी डबा लागला गळू, प्रवाशांचा संताप
Avantika Express Water Leak Videos

सध्या देशभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. एकीकडे यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे पावसामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. सध्या अवंतिका एक्सप्रेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रेल्वेच्या एसी डब्यात पाणी गळत आहे. व्हिडिओ मुंबईहून इंदूरला जाणाऱ्या अवंतिका एक्स्प्रेसच्या एसी डब्याचा आहे, ज्यामध्ये पाणी गळत असल्याचे दिसत आहे. ट्रेनच्या छतावरून पाणी गळू लागल्याने प्रवासी प्रचंड नाराज झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच काँग्रेसला सरकारवर हल्लाबोल करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे. या प्रकाराबाबत सोशल मीडियावरही रेल्वेवर टीका होत आहे. (हेही वाचा: Haryana Flash Flood: हरीयाणामध्ये नदीला महापूर, पंचकुला येथे वाहने पाण्यात अडकली, नागरिकांचीही गैरसोय)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2023 08:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).