जर तुम्ही भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखरचे चाहते असाल तर ही बातमी वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसेल. शिखर धवनने त्याची पत्नी आयशा मुखर्जीशी घटस्फोट घेतला आहे. आता शिखर आणि आयेशा एकत्र नसतील. जवळजवळ 9 वर्ष जुने नाते आता तुटले आहे आणि दोघे वेगळे होत आहेत. सध्या तरी या बातमीची अधिकृत पुष्टी झाली नाही मात्र, आयशा मुखर्जीने एक पोस्ट लिहिली आहे, त्यावरून या दोघांचा घटस्फोट झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिखरच्या चाहत्यांनी सोशल मिडियावर याबाबत प्रश्न उपस्थित करायचा सुरुवात केली आहे.

शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली होती. दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. धवन आणि आयेशा यांना झोरावर नावाचा मुलगाही आहे.

क्रिकेटर Shikhar Dhawan आणि Aesha Mukerji यांचा झाला घटस्फोट?

 

View this post on Instagram

 

A post shared by Aesha Mukerji (@apwithaesha)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aesha Mukerji (@apwithaesha)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)