जम्मू आणि काश्मीर आणि लडाखच्या उच्च न्यायालयाने नुकतेच एका बलात्कार प्रकरणावर सुनावणी करताना असे निरीक्षण नोंदवले की, पीडित व्यक्तीच्या गुप्तांगाला कोणतीही इजा झाली नसली किंवा तिथे आरोपीच्या वीर्यचे डाग नसले तरीही बलात्काराचा गुन्हा स्थापित केला जाऊ शकतो. न्यायमूर्ती संजय धर आणि न्यायमूर्ती राजेश सेखरी म्हणाले की, बलात्कार पीडितेवर उपचार करणारे वैद्यकीय तज्ज्ञ हे लैंगिक कृत्याचे कोणतेही पुरावे आहेत की नाही हे केवळ प्रमाणित करू शकतात, परंतु पिडीत व्यक्तीवर बलात्कार झाला आहे की नाही यावर अंतिम निर्णय देऊ शकत नाहीत.

न्यायालयाने नमूद केले, ‘बलात्काराचे निदान डॉक्टरांकडून होऊ शकत नाही. बलात्कार झाला आहे की नाही हे सांगणे हा त्यांचा व्यवसाय नाही. बलात्काराबाबत न्यायालय निर्णय घेऊ शकते.’ आपल्या एक वर्षाच्या नातीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या बोधराजने दाखल केलेले अपील फेटाळताना उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. वैद्यकीय तपासणीत, डॉक्टरांना असे आढळले की मुलीचे हायमन फाटलेले आहे आणि तिच्या गुप्तांगावर ताज्या जखमा आहेत. डॉक्टरांनी सुरुवातीला असे मत व्यक्त केले होते की, हे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण असू शकते, परंतु त्यांनी इतर शक्यताही नाकारल्या नव्हत्या. (हेही वाचा: HC On Wife's Threats Of Suicide And Torture: पत्नीच्या आत्महत्येच्या धमक्या हा पतीला मानसिक त्रास)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)