मल्लिकार्जून खडगे यांच्या रुपात काँग्रेस पक्षाला अध्यक्ष मिळाला आणि संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होण्यास सुरुवात झाली. राष्ट्रीय पातळीवर इंडिया नावाची आघाडी स्थापन झाल्यानंतर काँग्रेस पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खडगे यांच्या निवासस्थानी दिल्ली येथे एक बैठक पार पडत आहे. या बैठकीत काँग्रेसपुढील आव्हाने आणि पक्षांर्गत समस्या यावर चर्चा होत असल्याचे समजते. या बैठकीला काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस केसी वेणुगोपाल उपस्थित होते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)