ओडिशा राज्यात बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ट्रेनला ( Bengaluru-Howrah Express) झालेल्या अपघातमुळे देशभर हळहळ, दु:ख व्यक्त केले जात आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नवीन पटनायक यांनी म्हटले की. अत्यंत दुःखद रेल्वे अपघात.. मला स्थानिक संघटना, स्थानिक लोक आणि इतरांचे आभार मानावे लागतील. ज्यांनी लोकांना ढिगाऱ्यातून वाचवण्यासाठी रात्रभर काम केले. रेल्वेच्या सुरक्षेला नेहमीच प्रथम स्थान दिले पाहिजे. अपघातग्रस्तांना बालासोर आणि कटक येथील इस्पितळात प्राधान्याने न्यावे लागेल जेणेकरून ते लवकरात लवकर बरे होतील. (हेही वाचा, Ashwini Vaishnaw On Odisha Train Accident: 'मदत आणि बचाव कार्यास सर्वोच्च प्राधान्य, राजकारणासाठी वेळ नाही; अश्विनी वैष्णव यांची रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया)

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)