ओडिशा राज्यात बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ट्रेनला ( Bengaluru-Howrah Express) झालेल्या अपघातस्थळी केंद्रीय रेल्वेमंत्री (Railway Minister) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) शनिवारी (3 जून) दाखल झाले आहेत. वैष्णव यांनी अपघातग्रस्त रेल्वेची संपूर्ण पाहणी केली. मदत आणि बचाव कार्य राबविणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती निवारण (NDRF) दलांच्या पथकांसोबत चर्चा करुन त्यांनी प्रशासकीय यंत्रणेकडून आढवाही घेतला. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी अपघाताबद्दल विचारले असता त्यांनी 'मदत आणि बचाव कार्यास प्रथम प्राधान्य.. राजकारणासाठी वेळ नाही', अशी प्रतिक्रिया दिली.
अश्निनी वैष्णव जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा राष्ट्रीय आपत्ती निवारण (NDRF) दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), राज्य सरकार आणि भारतीय लष्कर घटनास्थळी बचाव कार्यात गुंतले होते. अपघाताच्या कारणांबाबत विचारले असता, अपघाताच्या कारणाबाबत भाष्य करणे घाईचे ठरेल असे सांगतानाच अपघाताच्या तपशिलांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. (हेही वाचा, Odisha Train Accident: ओडिशा येथील रेल्वे अपघातात 237 ठार, 900 हून अधिक जखमी; आकडा वाढण्याची भीती, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव बालासोरला रवाना)
ट्विट
#WATCH | Our focus is on rescue and relief operations. Restoration will begin after clearance from district administration. A detailed high-level inquiry will be conducted and the rail safety commissioner will also do an independent inquiry: Railways Minister Ashwini Vaishnaw… pic.twitter.com/yfCecv0FxB
— ANI (@ANI) June 3, 2023
रेल्वे मंत्री पुढे म्हणाले की, घटनास्थळी बचाव कार्याला आमचे प्राधान्य आहे, या घटनेवर राजकारण होता कामा नये. शोध, मदत आणि बचाव कार्यात सक्रिय असलेल्या एनडीआरएफ जवान अधिकाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.दरम्यान, ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात एकामागून एक तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि मोठा अपघात घडला. या अपघातातील मृतांची संख्या आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 238 वर पोहोचल्याची माहिती, रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तर जखमींची संख्या 900 पाह आहे. कोलकात्याच्या दक्षिणेस सुमारे 250 किमी दक्षिणेस आणि भुवनेश्वरच्या 170 किमी उत्तरेस, बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रेल्वेचा अपघात झाला.
ट्विट
#WATCH | The site of the horrific #BalasoreTrainAccident in Odisha where a collision between three trains left 233 dead & around 900 injured. Railways Minister Ashwini Vaishnaw is taking stock of the situation at the spot as search & rescue operation continues.
An ex-gratia of… pic.twitter.com/oTpbba338N
— ANI (@ANI) June 3, 2023
रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले की, 12864 बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे हावडा मार्गावर रुळावरून घसरले आणि लगतच्या रुळांवर पडले. हे रुळावरून घसरलेले डबे 12841शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले आणि त्याचेही डबेही उलटले, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली.