पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या निधनानंतर 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकार कडून प्रकाश सिंह बादल यांच्या निधनाचा शोक व्यक्त करताना हा दुखवटा जाहीर केला आहे. ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वज या काळात अर्ध्यावर आणण्यात येतो. अंत्यसंस्कारावेळी बंदुकांची सलामी देण्यात येते आणि शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला जातो. नक्की वाचा: Parkash Singh Badal Dies: प्रकाश सिंह बादल यांच्या निधनावर PM Narendra Modi यांच्याकडून ट्वीट करत शोक व्यक्त .
पहा ट्वीट
Central Government to declare two days of national mourning following the demise of former Punjab CM and Shiromani Akali Dal patron Parkash Singh Badal. https://t.co/ETbaHW0Ufy pic.twitter.com/krTclkwHEY
— ANI (@ANI) April 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)