Boxer Vijendra Singh Joins BJP: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बॉक्सिंगमधील भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेता आणि काँग्रेस नेते विजेंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विजेंदर सिंग यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक दक्षिण दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढवली होती पण त्यांचा पराभव झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे नाव मथुरा येथून पक्षाचे उमेदवार म्हणून चर्चेत होते, जिथून अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनी पुन्हा निवडणूक लढवत आहेत. विजेंदर सिंग हे जाट समाजातील आहे, ज्याचा हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील मोठ्या संख्येने जागांवर राजकीय प्रभाव आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विजेंदर सिंह म्हणाले की, देशाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  विजेंदर सिंगचा जन्म 29 ऑक्टोबर 1985 रोजी हरियाणातील भिवानी येथे झाला. (हेही वाचा: Rahul Gandhi on BJP : 'ही निवडणूक लोकशाही आणि देशाची राज्यघटना नष्ट करू पाहणाऱ्या शक्ती विरोधी लढाई'- राहूल गांधी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)