पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ड्रोन उडवून नवी दिल्लीत नव्याने बांधलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन-कम-कन्व्हेन्शन सेंटर (IECC) संकुलाचे उद्घाटन केले. याला 'भारत मंडपम' असे नाव देण्यात आले आहे. या स्मरणार्थ पंतप्रधान मोदींनी खास तिकीट आणि नाण्यांचेही प्रकाशन केले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी दिल्लीत जगातील सर्वात मोठे संग्रहालय बांधण्याची घोषणा केली. तसेच माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
तत्पूर्वी आज सकाळी पंतप्रधान मोदींनी या ठिकाणी हवन-पूजन केले. सुमारे 2700 कोटी रुपये खर्चून कन्व्हेन्शन सेंटरचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी 9 आणि 10 सप्टेंबर रोजी 18 वी G-20 बैठक आयोजित केली जाणार आहे. हे सिडनीच्या ऑपेरा हाऊसपेक्षा मोठे केंद्र आहे. ऑपेरा हाऊसमध्ये 5500 लोकांची बसण्याची क्षमता आहे, तर भारत मंडपममध्ये 7000 लोकांची बसण्याची क्षमता आहे. हा कॅम्पस अंदाजे 123 एकरमध्ये पसरलेला आहे. याला प्रगती मैदान कॉम्प्लेक्स असेही म्हणतात. येथे संमेलने, परिषदा, प्रदर्शने आयोजित करता येतात. (हेही वाचा: No Confidence Motion: केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव, काँग्रेसकडून खासदारांना व्हीप जारी)
#WATCH | PM Narendra Modi releases commemorative stamps and coins during the inauguration of IECC Complex in Pragati Maidan, Delhi pic.twitter.com/xbmhAuR9Al
— ANI (@ANI) July 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)