श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी आज (9 डिसेंबर) अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाचे छायाचित्र शेअर केले आहे. 22 जानेवारी 2024 दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. 5 वर्षांच्या श्रीरामांची ही मूर्ती असणार आहे. सध्या 3 मूर्त्या बनवण्याचं काम सुरू असून सर्वात रेखीव मूर्ती अंतिम केली जाणार आहे. Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony: प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यातील मुख्य पुजार्‍यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाशी कनेक्शन; पहा कोण आहेत मुख्य पुजारी दीक्षित?

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)