अयोद्धे मध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची (Ayodhya Ram Mandir) तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Consecration Ceremony) होणार आहे. त्यासाठी आता आमंत्रण देण्यास सुरूवात झाली आहे. 5 वर्षाच्या रामलल्लांची मूर्ती मंदिरात विराजमान करून त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेमध्ये महाराष्ट्राचं एक विशेष कनेक्शन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणाऱ्या काशीच्या गागा भट्टांचे वेदशास्त्र संपन्न वंशज पंडित श्री लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित यांच्या हस्ते अयोद्धेमध्ये रामलल्लांच्या मूर्तीची पूजा होणार आहे. 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला होता. 17 व्या शतकात गागा भट्टांनी हा राज्याभिषेक केला होता. Lata Mangeshkar यांच्या आवाजातील रेकॉर्ड केलेलं शेवटचं राम भजन गुंजणार अयोद्धेच्या राम मंदिर उद्घाटन प्रसंगी!
पहा ट्वीट
महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी आणखी एक गोष्ट : -
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणाऱ्या काशीच्या वेदशास्त्रसंपन्न गागा भट्टांचे वेदशास्त्र संपन्न वंशज पंडित श्री लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित यांच्या हस्ते होणार अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरातील श्री रामलल्लाची…
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) December 8, 2023
महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये 16 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. पंडित लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित यांच्यासोबत वेदांचा अभ्यास असलेले 121 इतर विद्वान देखील या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. 40 हून अधिक पंडित काशीतून येणार असून 7 दिवस अभिषेक होणार आहे. पंडित लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित 86 वर्षीय आहेत. Ayodhya Ram Mandir Inauguration: अयोद्धा राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला Sachin Tendulkar ते Mukesh Ambani 7000 खास पाहुण्यांना आमंत्रण!
21 जानेवारी दिवशी रामलल्लाच्या मूर्तीला 114 कलशांच्या विशेष पाण्याने स्नान घातलं जाणार आहे. यामधील पाणी प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांमधून आणले जाणार आहे. 22 जानेवारीला दुपारी प्राणप्रतिष्ठा (अभिषेक) विधी होईल. सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत मूर्ती गर्भगृहात नेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.