यंदा 17 जुलै दिवशी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. वारकर्‍यांमध्ये आषाढी वारी चं विशेष आकर्षण असत. मजल दरमजल करत अनेक भाविक, वारकरी हरिनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने जातात. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेतात. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही आज विठूभक्ती मध्ये वराकर्‍यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.'टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीची वीणा माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा ' या कॅप्शनसह त्यांनी एक  व्हिडीओ शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा यांचं ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)