सध्या मराठी बिग बॉसचे तिसरे पर्व जोरात सुरु आहे. पहिले तीन आठवडे उलटून गेले आहेत व या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. कीर्तनकार शिवलीला पाटील या बिग बॉस मराठीच्या एक स्पर्धक होत्या मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांना घरातून बाहेर पडावे लागले. पाटील जेव्हा बिग बॉसच्या घरात होत्या तेव्हा सोशल मिडियावर बरेच ट्रोल करण्यात आले होते. आता शिवलीला पाटील यांनी सांगितले आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी बिग बॉस व्यासपीठाचा आधार घेतला होता. यासोबतच वारकरी संप्रदायांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते, असेही शिवलीला पाटील म्हणाल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)