खराब वातावरणामुळे स्थगित झालेली अमरनाथ यात्रा Baltal Base Camp वरून  पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पायी यात्रे सोबतच चॉपर सर्व्हिस देखील पुन्हा सुरू झाली आहे. रविवार दुपार पासून पेहलगाम बेस कॅम्प वरून यात्रा सुरू करण्यात आली असल्याची तर आज सोमावार, 10 जुलै पासून बालटाल  बेस कॅम्प वरून यात्रा  पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पारंपारिक 48-किलोमीटर पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील 14-किलोमीटर बालटाल मार्ग यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि भूस्खलन झाल्यामुळे शुक्रवारी यात्रा स्थगित करण्यात आली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)