पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्राधान्याने उतरवण्यात आले. विंडशील्ड क्रॅक झाल्याचा संशय आल्याने विमानाला प्रथम विमानतळावर उतरण्याची परवानगी द्यावी, असे वैमानिकाने विमानतळाला कळवले होते. त्यामुळे विमान तातडीने धावपट्टीवर सामान्यपणे उतरवले गेले. विमान एअर इंडियाचे होते. याआधी दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या फ्लाइटला कॉकपिटच्या खोट्या अलर्टमुळे परत दिल्लीच्या विमानतळावर उतरावे लागले होते.
A Delhi-bound Air India flight pilot asked for priority landing at Delhi airport and it landed normally after a suspected windshield crack. The flight originated from Pune.
— ANI (@ANI) April 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)