Ahmedabad Schools Bomb Threats: देशाची राजधानी दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर, आता अहमदाबादमधील जवळजवळ सात शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी दिली गेली आहे. गुजरातमध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे, त्याच्या एक दिवसापूर्वी अशी धमकी मिळाल्याने पोलीस प्रशासन हादरले आहे. ज्या शाळांमध्ये धमक्या आल्या आहेत, त्या शाळांमध्ये बॉम्ब निकामी पथकासह पोलीस पोहोचले आहेत. रशियन सर्व्हरकडून धमकी मिळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अहमदाबादच्या घाटलोडिया येथील आनंद निकेतन स्कूल आणि चांदखेडा येथील केंद्रीय विद्यालयासह तीन शाळांना धमक्या मिळाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या या शाळांमध्ये सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. गुजरातमधील शाळांमध्ये सध्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू आहेत. (हेही वाचा: ED Jharkhand Raid: निवडणुकीच्या धामधुमीत ईडीची मोठी छापेमारी; झारखंडमधील मंत्र्यांच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरून शोधून काढला नोटांचा डोंगर)
पहा पोस्ट-
Gujarat: Three schools in Ahmedabad receive bomb threats through email. Ahmedabad Police is probing the matter. Details awaited.
— ANI (@ANI) May 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)