7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत (DR) यामध्ये 4 टक्के वाढ मंजूर केली आहे. आता कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 50 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. हा महागाई भत्ता 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल. ही वाढ मार्चअखेर पगारासह जमा केली जाईल. अशाप्रकारे यात एकूण दोन महिन्यांची थकबाकी जोडली जाणार आहे. सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने सरकारी तिजोरीवर 12,868.72 रुपयांचा बोजा वाढणार आहे. मार्चमध्ये होळीपूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. याचा फायदा सुमारे 49.18 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. ही वाढ 7 व्या  केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित स्वीकृत सूत्रानुसार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)