17 Crore Injection To Save Life: उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून देश आणि जगासाठी एक आनंदाची बातमी आहे. टाईप वन स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी म्हणजेच एसएमए या आजाराने ग्रस्त सहारनपूरच्या गरीब कुटुंबातील पंधरा महिन्यांच्या भुदेव या मुलाला जीवनदान मिळाले आहे. भूदेवला 17 कोटी रुपयांचे इंजेक्शन लागणार होते. भूदेवच्या कुटुंबाने आपली सर्व मालमत्ता आणि घरे विकली असती तरीही त्यांना एवढी मोठी रक्कम जमवता आली नसती मात्र या मुलासाठी जनता, लोकप्रतिनिधी, समाजसेवक पुढे आले आणि आज त्याचाच परिणाम म्हणजे नवी दिल्ली एम्समध्ये भूदेवला हे इंजेक्शन देण्यात आले. भूदेव याच्या आयुष्यासाठी माजी खासदार राघवलखान पाल शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. तसेच आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून भूदेवला मदत करण्याची विनंती केली होती. अन्य लोकप्रतिनिधींनीही आपापल्या स्तरावरून भूदेवांसाठी प्रयत्न केले होते. आता सर्वांच्या प्रयत्नांना यश आल्याचे मानले जात असून अखेर भूदेवला जीवनाचे इंजेक्शन मिळाले.
नवी दिल्ली एम्सच्या डॉक्टरांच्या पॅनेलने भूदेवला हे इंजेक्शन दिले आहे. या इंजेक्शननंतर भूदेव शर्माला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. सर्व काही सुरळीत झाल्यास शुक्रवारी भूदेवला जनरल वॉर्डात हलवले जाईल, अशी अपेक्षा आहे. दोन आठवड्यांत, त्याचे मोटार टप्पे वाढू लागतील, डोके नियंत्रित होईल व त्यानंतर बसणे आणि नंतर उभे राहणे अशा सर्व गोष्टी हळूहळू सुधारतील. (हेही वाचा: आईने 5 हजार देण्यास दिला नकार; तरुणाने गळा आवळून जन्मदात्रीची केली हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये भरून पोहोचला प्रयागराजला, पोलिसांकडून अटक)
VIDEO | Fifteen-month-old Bhudev, suffering from Spinal Muscular Atrophy (SMA Type-1), receives a life-saving injection of Zolgensma worth 17 Crore at AIIMS Delhi.
"In a couple of weeks, his motor milestones will start increasing - head control, sitting, and later on standing.… pic.twitter.com/hCJEJSkZik
— Press Trust of India (@PTI_News) December 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)