Bihar Shocker: आईने 5 हजार देण्यास दिला नकार; तरुणाने गळा आवळून जन्मदात्रीची केली हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये भरून पोहोचला प्रयागराजला, पोलिसांकडून अटक
Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

पैशांसाठी आपल्या आईची हत्या केल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बिहारमधील (Bihar) एका आयआयटी उमेदवाराने आपल्या आईची निर्घृणपणे हत्या केली आणि तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून प्रयागराजच्या त्रिवेणी संगम येथे त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. हिमांशू असे आरोपीचे नाव असून, आईने त्याला 5,000 रुपये देण्यास नकार दिल्याने त्याने तिची हत्या केली. आरोपी हिमांशूला उत्तर प्रदेशात अटक करण्यात आली.

डीसीपी (शहर) दीपक भुकर यांनी सांगितले की, 13 डिसेंबर रोजी हिसार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या हिमांशूने त्याची आई प्रतिमा देवी (42) यांच्याकडे 5,000 रुपये मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात मोठे भांडण आणि मारामारी झाली. यावेळी रागाच्या भरात हिमांशूने आईचा गळा आवळून खून केला. त्यानंतर गुन्हा लपविण्यासाठी आरोपी मुलाने आईचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि ट्रेनने प्रयागराजला आला. संगमात मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना त्याने आखली होती.

भुकर यांनी पुढे सांगितले, आज सकाळी दारागंज पोलीस ठाण्याचे पोलीस नदीकाठच्या संगम भागात गस्त घालत असताना त्यांना हिमांशूची सुटकेस संशयास्पद वाटली. पथकाने सुटकेसची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिमा देवी यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि हरियाणा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. हिमांशूची बहीण आणि वडिलांनाही याची माहिती देण्यात आली आहे. प्रतिमा देवी हिसार येथील एका सूतगिरणीत काम करत होत्या. (हेही वाचा: Kerala Video: केरळ मधील वयोवृध्द सासूला मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल, आरोपी महिलेला अटक)

चौकशीदरम्यान आरोपी हिमांशूने सांगितले की, तो मूळचा बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील असून तो आई प्रतिमा देवीसोबत हरियाणातील हिसार येथे आपल्या बहिणीच्या सासरच्या घरी आला होता. प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.