नेताजी सुभाष चंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose) भारतातील महान स्वातंत्र्यसैनिक होते ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केले आणि राष्ट्रातील लोकांना विरोध आणि क्रांतीच्या कट्टरपंथी स्वरूपाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. भारतीय जनतेवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध त्यांनी लढ्यात केलेल्या त्यांच्या योगदानासाठी श्रद्धांजली म्हणून, सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस दरवर्षी 23 जानेवारी रोजी देशभरात साजरा केला जातो. राष्ट्रीय दिवस, पराक्रम दिवस किंवा शौर्य दिवस म्हणूनही ओळखला जातो. यंदा नेताजींची 125 वी जयंती रविवारी साजरी केली जाणार आहे. नेताजी यांच्या जंयती निमित्त दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे. होलोग्राम पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)