Prajwal Revanna Case: हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांना शुक्रवारी लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी 6 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रेवन्नाच्या वकिलांना दररोज सकाळी 9.30 ते 10.30 दरम्यान भेटण्याची परवानगी दिली जाईल, असे शहर न्यायालयाने सांगितले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) जेडी-एस खासदाराविरुद्ध दाखल केलेल्या तीन लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांपैकी पहिल्या प्रकरणात रेवन्नाची 15 दिवसांची कोठडी मागितली होती. म्युनिकहून बेंगळुरूला आल्यावर त्याला शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली. अटक होण्यापूर्वी प्रज्वलने बलात्कार पीडितेचे अपहरण केल्याच्या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी स्थानिक न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, शनिवारी त्याची आई भवानी रेवण्णा यांची एसआयटी चौकशी करणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)