Amit Shah 2024 Prediction: भारताचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा मंगळवारी, 11 एप्रिल रोजी आसाममधील दिब्रुगड येथे पोहोचले. दिब्रुगडमधील भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात अमित शहा सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शाह यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबतही चर्चा केली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. पण आज शाह यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मोठी भविष्यवाणी केली. शहा यांच्या या अंदाजात त्यांचा आत्मविश्वासही स्पष्ट दिसत होता. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत शहा यांनी भाजपसाठी मोठे भाकीत केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप चमकदार कामगिरी करेल आणि पक्षाला 300 हून अधिक जागांवर बंपर विजय मिळेल, असे शाह यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Rahul Gandhi Road Show in Wayanad: राहुल गांधी यांचा वायनाडमध्ये भव्य रोड शो, प्रियंका गांधीचाही सहभाग)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)