Delhi News: दिल्लीतील केशोपूर भागात एका बोअरवेलमध्ये अल्पवयीन मुलगा पडल्याची माहिती अधिकाऱ्यांने दिली आहे. सुमारे ४०- ५० फूट खोल बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील अग्निशमन सेवांचे बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली अग्निशमन सेवा, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) आणि दिल्ली पोलिसांच्या पथकांच्या नेतृत्त्वाने बचाव कार्य सुरु आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिकाऱ्यांने माहिती दिली आहे की, जेथे मुल पडले आहे तिथच दुसऱ्या बाजूला बोअरवेल खोदण्यात येत आहेत. बचावकार्य दीर्घकाळ सुरु राहिल, लवकरच मुलापर्यंत पोहचू.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)