मध्य प्रदेशातील सिधी येथे आज सकाळी मोठी दुर्घटना टळली. जेव्हा एक खाजगी शाळेची बस मुलांना घेऊन शाळेत जात होती. त्याचवेळी बसने अचानक पेट घेतला. त्यानंतर बस पेटू लागली आणि बसमधील मुले रडू लागली. सुदैवाने मुलांना पटकन बसमधून खाली आणण्यात आले. त्यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही एसआयटी शाळेची खासगी बस होती. बसमध्ये जवळपास 5 मुले होती. सर्वांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. बसला आग लागल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. बस जळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडिओ -
VIDEO | A school bus caught fire in MP's Sidhi earlier today. More details are awaited. pic.twitter.com/sPL4mjMALf
— Press Trust of India (@PTI_News) December 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)