Madhya Pradesh Crime:  मध्य प्रदेशातील इंदूरमधील रहिवासी परिसरात रविवारी रात्री दोन हल्लेखोरांनी उभ्या असलेल्या वाहनांना आग लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. जाळपोळ केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. ही संपूर्ण घटना बाणगंगा परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इंदूरमधील बाणगंगा पोलीस ठाण्यातील रहिवासी मन्नू लाल कश्यप यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्कूटरसह तीन वाहनांना आग लावली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)