fire PC ANI

Waluj Hand Gloves Company Fire: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हॅंडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मध्यरात्री जेव्हा कामगार झोपेत होते तेव्हा ही आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून 4 कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव वाचवला आहे. ही आग वाळूज औद्योगित परिसरात लागली. आगीची माहिती मिळताच, प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ही आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.( हेही वाचा- मध्य प्रदेशातील ग्वालेर येथे प्लास्टिकच्या कारखान्याला आग, कोणतीही जीवितहानी नाही)

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील वाळूज औद्योगित परिसरातील सनशाईन एंटरप्राईज सी 216 या हॅंडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला आग लागली. मध्यरात्री या कंपनीला आग लागली तेव्हा कंपनीत १० कामगार होते. कंपनीत २० ते २५ कामगार काम करतात अशी माहिती मिळाली. मध्यरात्री झोपेत असताना, अचनाक आग लागली. काही कामगारांना झोपेत असताना जळल्याचे वास येत असल्याने उढले. कामगारांमध्ये गोंधळ होऊ लागला. जीव वाचवण्यासाठी सर्वांची पळापळ सुरु झाली.

कंपनीतील मुख्य गेटजवळ आग लागल्याने कर्मचाऱ्यांना बाहेर येता येत नव्हते, त्यामुळे काहींनी पत्र्यावरून उडी मारत प्राण वाचवले तर काही जण कंपनीत अडकले. त्यामुळे ६ जणांचा या घटनेत मृत्यू झाला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख आणि अन्य दोन मिर्झापूर या सहा कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.