Kolkata Building Collapsed : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee )यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून 5-6 जण अजूनही आत अडकले आहेत. वैद्यकीय, अग्निशमन दल आणि इतर विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. बेकायदेशीरपणे इमारत बांधली जात होती. राज्य प्रशासनाकडून इमारत बांधण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या इमारतीच्या बांधकामात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना राज्य सरकार ( government help )मदत करेल. जवळपासच्या घरांचेही नुकसान झाले आहे, त्या लोकांनाही सरकार मदत करेल". असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. (हेही वाचा :Bihar Road Accident Video: बिहारमधील खगरिया येथे कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघातात; 7 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश (Watch Video) )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)